Posts

मावळ्यांनो मोहिम फत्ते झाली...

Image
मुंबई :  ‘एक मराठा, लाख मराठा’ म्हणत आज राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांनी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारला. भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढून मराठा शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केलं. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना जितक्या सवलती मिळतात, तितक्याच सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करताना दिली. 605 अभ्यासक्रमांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार आहे. मराठा मोर्चाबाबत विधानसभेत झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन दिलं. मागासवर्गीय आयोगाकडे आपण याचा पाठपुरावा करणार असून ठराविक मुदतीत अहवाल देण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या मागण्या : ओबीसींप्रमाणे मराठा समाजासाठी छत्रपती शाहू महाराज ही योजना आणली जाईल. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे तीन लाख तरुण स्कील ट्रेनिंग देणार आहेत. दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार. प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेलसाठी पा...

मराठ्यांनो कशासाठी जायचं मुंबई मोर्चाला ?

Image
वाचा आणि विचार करा… १) आजपर्यंत ५८ ठिकाणी मोर्चे काढले. ते काय गर्दी दाखवायला, शक्तीप्रदर्शन करायला किंवा मौज म्हणुन काढले नव्हते. मराठा समाजाच्या अनेक वर्षांच्या मागण्या मार्गी लागाव्यात, समाजाला न्याय मिळावा, सरकारचे लक्ष वेधले जावे यासाठी काढले होते. त्यातल्या किती मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार केला याचा त्यांना जाब विचारण्यासाठी जायचंय… २) स्त्री मग ती कोणत्याही जातीधर्माची असो, तिचा सन्मान करायला राजांनी आपल्याला शिकवलं. मात्र कोपर्डीसारख्याच अनेक बहिणींवर अत्याचार होत असताना प्रत्येक वेळी करणाऱ्यांना शिक्षा द्यायला विलंब का लागतो याचा सरकारला जाब विचारायला जायचंय… ३) शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे आणि मराठा समाजातील शेतकऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. शेतकरी संप करुनही शेतकरी कर्जमाफी, हमीभाव का मिळत नाही, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागु का होत नाहीत, शेतकऱ्यांची फसवणुक का केली याचा सरकारला जाब विचारायला जायचंय… ४) मराठा समाजाला आरक्षण देताय की जाताय हे सत्ताधाऱ्यांना ठणकावुन विचारायला जायचंय… ५) अट्रॉसिटी कायद्याचा मराठा समाजाच्...

मराठा क्रांती मोर्चाच्या काय मागण्या आहेत ते पहा…

Image
मराठा क्रांती मूक मोर्चा च्या प्रमुख मागण्या १) मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी. खटला लांबविण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडावेत. २) मराठा समाजास कायदेशीर तरतुदीनुसार आरक्षण मिळालेच पाहिजे. ३) अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ठी करावी. ४) शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती व शेतीमालास हमीभाव मिळणे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे. ५) प्रकल्पासाठी शेतजमीन संपादन करताना शेतकऱ्यांना देशोधडीला लावणे बंद करणे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास आर्थिक मदत देणे. ६) कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी-मराठा यांना जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे. ७) मराठा,इतर मागास, खुला प्रवर्गातील सरकारी अधिकारी कर्मचारी यांचेवर पदोन्नतीत होणारा अन्याय थांबविण्यात यावा. ८) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे. ९) मराठा समूहाच्या सर्वागीण विकासासाठी शा...

मराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…

Image
मराठा क्रांती मूक मोर्चाची आचारसंहिता ● हा मूक मोर्चा आहे.मोर्चात चालत असताना एकमेकांशी बोलणार नाही,घोषणा देणार नाही. ● मी मोर्चाचे गांभीर्य राखणार.कोणी घोषणा दिल्या तर त्याला तिथेच रोखणार. ● मोर्चात अधिकृत बॅनर शिवाय कोणतेही वैयक्तिक/संस्था संघटनांच्या नावाने बॅनर्स लावणार नाही. ● माझा मोर्चा कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही. मराठ्यांच्या मागण्यासाठी व आत्मसन्मानासाठी आहे. ● मोर्चात जास्तीत जास्त महिला सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार. ● मोर्चामध्ये मी कुठल्याही पक्षाचा किंवा संस्थेचा नसून फक्त मराठा म्हणून येणार. ● मोर्च्यांच्या दिवशी सकाळी ११:०० वा. कुटुंबासह दाखल होणार. ● मोर्चात स्वयंशिस्त पाळून मराठा समाजाच्या सुसंस्कृतपणा दाखवणार, पोलिसांना सहकार्य करणार. ● मोर्चात मी कोणतेही व्यसन करून सहभागी होणार नाही,कोणाला करूही देणार नाही. ● महिला,लहान मुले व वृद्धांना सहकार्य करणार,माता,भगिनींना पुढे जाऊ देईन. ● मला जिथे जागा मिळेल तिथूनच मी चालेल. मी घाई गडबड करणार नाही. ● मोर्चाला अत्यंत शांततेत येणार व गावाकडे परत शांततेत जाणार. ● कुणालाही त्रास होणार ...

तुम्ही मराठा क्रांती मोर्चात कोणत्या जिल्हातुन सहभागी झाला आहात?

Image
तुम्ही मराठा क्रांती मोर्चात कोणत्या जिल्हातुन सहभागी झाला आहात? सोलापूर पुणे कोल्हापूर सातारा ठाणे जळगाव अहमदनगर अकोला मुंबई अमरावती औरंगाबाद बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर नाशिक रायगड धुळे नागपूर परभणी सांगली ठाणे लातूर उस्मानाबाद यवतमाळ वर्धा सिंधुदुर्ग इतर जिल्ह्यातुन आलो आहोत काही कारणास्तव येऊ शकलो नाही परंतु मोर्चास कट्टर समर्थन आहे SurveyMaker