मराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…

मराठा क्रांती मूक मोर्चाची आचारसंहिता
● हा मूक मोर्चा आहे.मोर्चात चालत असताना एकमेकांशी बोलणार नाही,घोषणा देणार नाही.
● मी मोर्चाचे गांभीर्य राखणार.कोणी घोषणा दिल्या तर त्याला तिथेच रोखणार.
● मोर्चात अधिकृत बॅनर शिवाय कोणतेही वैयक्तिक/संस्था संघटनांच्या नावाने बॅनर्स लावणार नाही.
● माझा मोर्चा कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही. मराठ्यांच्या मागण्यासाठी व आत्मसन्मानासाठी आहे.
● मोर्चात जास्तीत जास्त महिला सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार.
● मोर्चामध्ये मी कुठल्याही पक्षाचा किंवा संस्थेचा नसून फक्त मराठा म्हणून येणार.
● मोर्च्यांच्या दिवशी सकाळी ११:०० वा. कुटुंबासह दाखल होणार.
● मोर्चात स्वयंशिस्त पाळून मराठा समाजाच्या सुसंस्कृतपणा दाखवणार, पोलिसांना सहकार्य करणार.
● मोर्चात मी कोणतेही व्यसन करून सहभागी होणार नाही,कोणाला करूही देणार नाही.
● महिला,लहान मुले व वृद्धांना सहकार्य करणार,माता,भगिनींना पुढे जाऊ देईन.
● मला जिथे जागा मिळेल तिथूनच मी चालेल. मी घाई गडबड करणार नाही.
● मोर्चाला अत्यंत शांततेत येणार व गावाकडे परत शांततेत जाणार.
● कुणालाही त्रास होणार नाही असे माझे वर्तन राहील.
● मोर्चात झालेला कचरा उचलून कचरा कुंडीत टाकणार,रिकाम्या पाण्याच्या बॉटल,पाऊच आणि पडलेले ग्लास गोळा करण्यासाठी प्रयत्न करणार.
● स्वाभिमान,स्वावलंबन,शिक्षण, सहकार्य,जागृती या पंचसूत्रीचा समाजविकासासाठी अंगीकार करणार.
मुंबई मराठा क्रांती मूक मोर्चा ९ ऑगस्ट सुरक्षा सूचना
१.मोर्चाला येताना कुठल्याही अनोळखी वस्तूंना हात लावू नये. अशी वस्तू आढळल्यास किंवा निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस किंवा मराठा सेवकांच्या नजरेस आणून द्यावी.
२.मोर्चात सामील होणाऱ्या राज्यातील व परराज्यातील सर्व मराठा बांधवांना नम्र विनंती ओण आपली वाहने सावकाश चालवावीत व ओव्हरटेक,लेन कटिंग करून ट्राफिक जाम करू नये.
३.आपण आपल्या पाठीमागून येणाऱ्या मराठा बांधवांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
४.मोर्चात सामील होणाऱ्या बांधवांपैकी मधुमेह,रक्तदाब,ऍलर्जी असणाऱ्यांनी स्वतः ची औषधी बरोबर बाळगावीत, पावसाळी दिवस असल्यामुळे छत्री/रेनकोट सोबत असावे.
५.लहान मुले व वयस्क व्यक्तींच्या खिशामध्ये ओळखपत्र व इतरांचे मोबाईल नंबर द्यावेत.
६.मोर्चात सामील होणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला खाण्यासाठी सुके पदार्थ उदा.बिस्कीट,चिवडा इत्यादी सोबत बाळगावे व पाण्याची बॉटल असावी.
७.मोर्चात सामील होणाऱ्या सर्व मराठा बांधवांनी आपल्या ड्रायव्हरसह सहकार्याच्या नंबर ची नोंद एका कागदावर ठेवावी.ड्रायव्हरने गाडी पार्क केल्यावर गाडी सोडून जाऊ नये तसेच मूळ ठिकाणावरून निघताना गाडीमध्ये पूर्ण प्रवासकरिता पुरेसे इंधन (डिझेल,पेट्रोल) भरणे आवश्यक आहे.
८.मोर्चात सामील होण्यासाठी ५० ग्रॅम खडीसाखरेचे प्लास्टिक पाऊच सोबत बाळगावे.
९.मोर्चात सहभागी महिलांनी व मुलींनी मौल्यवान दागिने परिधान करू नये.
१०.मोर्चात सामील होणाऱ्या प्रत्येकाने साहित्य झेंडा,टी-शर्ट,स्टिकर,टोप्या योग्य रीतीने परिधान कराव्या. तसेच नाम फलक,घोषणा सर्वांना दिसतील आशा पद्धतीत असावे.
११.मोर्चात सामील होणाऱ्या मोर्चेकरांनी शक्यतो रेल्वे ने प्रवास करावा.
१२.मोर्चामध्ये संशयास्पद,असामाजिक व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
१३.आपला हा मूक मोर्चा असल्यामुळे कोणत्याही घोषणा देऊ नये व इतर कोणी देत असल्यास तात्काळ थांबवाव्यात.
१४.मराठा क्रांती मोर्च्यांच्या अधिकृत मागण्या व्यतिरिक्त हातातील फलक किंवा पत्रक कोणी वाटत असेल तर तात्काळ मराठा सेवक व पोलिसांच्या निदर्शनास आणून देणे.
१५.सकल मराठा समाज महाराष्ट्राच्या वतीने मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन केले आहे.
१६.सोशल मीडिया व इतर माध्यमांचा वापर करून मोर्चाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला तर मराठा सेवकांनी तात्काळ याची खबरदारी घ्यावी.
१७.मराठा क्रांती मोर्चाची आदर्श आचारसंहिता प्रत्येक मराठा समाज बांधवांनी पाळावी.
१८.पाठीमागून येणाऱ्या मुली व महिलांना पुढे जाण्यासाठी जागा करन द्यावी.
१९.मोर्चा समाप्त झाल्यानंतर मराठा सेवकांनी व मराठा युवकांनी स्वच्छता अभियानाध्ये सामील व्हावे.
२०.वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.
२१.वाहन पार्किंग करताना इतरांना अडचण होईल,असे पार्क करू नये.
२२.मराठा सेवकांनी मोर्चा सुरु झाल्यापासून समाप्तीपर्यंत डोक्यावर बर्फाचा गोळा व तोंडात गुळाचा खडा ठेवावा.
२३.मोर्चात गर्दीमध्ये चुकल्यास मराठा सेवक किंवा पोलीस मदत केंद्राची मदत घ्यावी.
२४.मोर्चातील मराठा बांधवांना नम्र विनंती की मराठा सेवकांना व पोलिसांना सहकार्य करावे.
२५.मोर्चा चालू झाल्यानंतर प्रत्येकाने योग्य असे अंतर ठेवून चालावे.
२६.मोर्च्यांच्या परिसरात चुकून एखादा मोठा आवाज आला तर तो गाडीच्या टायर फुटण्याचा असू शकतो घाबरण्याचे काही कारण नाही.
२७.मोर्चाचे चित्रीकरण करत असताना ड्रोन कॅमेरा चुकून पडला तर घाबरून जाऊ नये.
आपला
एक मराठा लाख मराठा


Comments

Popular posts from this blog

तुम्ही मराठा क्रांती मोर्चात कोणत्या जिल्हातुन सहभागी झाला आहात?

मराठ्यांनो कशासाठी जायचं मुंबई मोर्चाला ?

मावळ्यांनो मोहिम फत्ते झाली...